खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेची जुनी इमारत मोडकळीस आल्याने धोकादायक बनली. यामुळे शिरोली ग्रामस्थांतून भितीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या शाळेच्या इमारती कोसळत आहे. मात्र याकडे संबंधित खात्याचे व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
गावात असलेल्या या शाळा इमारतीच्या आवारत लहान मुले सतत खेळत असतात. वेळ काही सांगता येत नाही. अशा वेळी मुलाच्या डोकीत कौले पडून अथवा भिंत कोसळून अनर्थ घडला तर याला जबाबदार कोण. गेलेला जीव परत कोण आणून देणार? असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी जुन्या शाळा इमारतीची पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा ग्रामस्थांनी संबंधित खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
