बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने उद्या बुधवार दिनांक 23 रोजी शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव पाहता शासकीय नियमावलीनुसार सामाजिक अंतर ठेवून शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जाणार आहे.
प्रत्येक शिवभक्तांना या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात शिवाजी उद्या येथे सहभागी होता येणार नाही. यासाठी तालुका व गाव पातळीवरील प्रत्येक शिवभक्तांनी आपापल्या घरात शिवमूर्ती किंवा शिव प्रतिमेचे पूजन करून शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करावा, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी केले आहे.
Check Also
हिवाळी अधिवेशनावर 580 सीसीटीव्ही तर 10 ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर
Spread the love बेळगाव : सोमवार पासून सुरु होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी …