Wednesday , March 26 2025
Breaking News

बेळगांव जिल्हा बॅंक राज्यात ‘नंबर वन’ : गजानन क्वळी

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात नंबर वन ठरल्याचे नूतन संचालक गजानन क्वळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, आपणाला नामनिर्देश संचालक म्हणून निवड केलेल्या भाजपाचे मंत्रीगण, खासदार आमदार या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. राज्यातील जिल्हा बॅंकांत बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अव्वल स्थानावर आहे. अखिल भारतात आमची बॅंक दुसऱ्या स्थानी आहे. बेळगांव जिल्हा बॅंकेवर निष्णात नेते निवडले गेले आहेत. यामध्ये माझी निवड व्हावी हा माझा मी मोठा गौरव समजतो. कारण बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती असून संचालक मंडळात राज्याचे उपसभापती आनंद मामनी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार महांतेश दोडगौडर, माजी आमदार अरविंद पाटील असे दिग्गज नेते कार्यरत आहेत. आपण जिल्हा बॅंकेवर चौथ्यांदा संचालक म्हणून निवडले गेलो आहोत. आपण प्रथम २००० साली संचालक म्हणून निवडले गेलो होतो. त्यावेळी बॅंकेची स्थिती नाजूक होती. त्याचवेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्षस्थानी रमेश कत्ती निवडले गेले. गेल्या बारा वर्षांत जिल्हा बॅंक प्रगतीपथावर नेण्याचे काम त्यांनी करुन दाखविले आहे. आज बॅंकेकडे ३५०० कोटी रुपयांचे फंड आहे. जिल्हा बॅंकेच्या प्रगतीत अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ कर्मचारी वर्ग‌‌‌ आणि बॅंक ग्राहकांचा सिंहांचा वाटा राहिला आहे. आपली अपेक्षा बॅंकेतून निवड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाबार्ड योजनेचा पुरेपूर लाभ मिळवून देण्याचा आपला मानस आहे. जिल्हा बॅंकेत राजकारण असले तरी ते बॅंकेच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणारे नाही. सहकारी संघ संस्थांत राजकारणाने शिरकाव केला आहे. आपले निवड कायदेशीररीत्या करण्यात आली आहे. त्यामुळे कोणी आक्षेप नोंदविण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बॅंकेवर आपणाला चौथ्यांदा संचालक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाल्याने आपणाला मोठा आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रामण्णा क्वळी, नागेश क्वळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरात तुळजाभवानी मूर्तीची उद्या प्रतिष्ठापना!

Spread the love  संकेश्वर : गोंधळी समाजातर्फे सुभाष रोड कमतनुर वेस नजीक लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *