संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुन्या पुणे-बेंगळूर मार्गावरील सदा कब्बूरी यांच्या एम.एस.बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावरील इगनायट पर्सनल ट्रेनिंग स्टुडिओचा उद्घाटन सोहळा नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थितांचे स्वागत जिमचे प्रशिक्षक गौतम उर्फ ओंकार पोवार यांनी केले. उद्घाटन सोहळ्याला माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक डॉ. मंदार हावळ, सदा कब्बूरी, राजेंद्र बोरगांवी, समीर पाटील, शाम यादव, डॉ. शितल भिडे, सुधाकर ओतारी, दादू बेविनकट्टी, विनोद संसुध्दी, अमोल दळवी, प्रदीप आडी, बबलू मुडशी, स्वप्नील पलसे, सुजल नष्टी, शुभंम बागलकोटी, प्रविण नष्टी, संपत यशागोळ, सागर जकाते, विश्वनाथ यशागोळ, अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिमची माहिती देताना ओंकार पोवार म्हणाले, इगनायट पर्सनल ट्रेनिंग स्टुडिओमध्ये पुरुष आणि महिलांसाठी ट्रेनर असून अत्याधुनिक जिम साहित्य उपलब्ध आहे. त्याचबरोबर मसाजची सोय देखील करण्यात आली आहे. आपल्या इगनायट जिममध्ये युवक-युवतीनी, महिलांनी प्रवेश घेऊन फिटनेस व्हावे असे त्यांनी सांगितले.