Saturday , June 15 2024
Breaking News

संकेश्वरची अन्यायकारक पाणीपट्टी बंद करा : मुस्तफा मकानदार

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेला लोकांची चिंता आहे की नाही. गेल्या दोन वर्षांपासून संकेश्वरातील लोक कोरोना महामारीने कंगल झाले आहेत. बऱ्याच युवकांना नोकरी गमवावी लागली आहे. व्यापार-व्यवसाय घाट्यात चालवला आहे. त्यामुळे गोरगरिब, कष्टकरी सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा स्थित पालिकेची आव्वाची-सव्वा पाणीपट्टी लोक भरणार कोठून हा प्रश्न निर्माण झाल्याचे संकेश्वर घटक काॅंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष मुस्तफा मकांनदार यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, संकेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी संकेश्वरातील लोकांची सद्य परिस्थिती समजून घेऊन पाणीपट्टी पूर्ववत वर्षाकाठी १५६० रुपये मात्र आकारण्याचे कार्य करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वर बायपास रस्त्यावर वाहनांवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर बायपास रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चालत्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *