संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरची प्रमुख बाजारपेठ आज ट्रॉफिक जाम झालेली दिसली. शनिवार, रविवार विकेंड कर्फ्युमुळे जुना पी. बी. रस्ता ते कमतनूर वेस तसेच गावात सर्वत्र शुकशुकाट होता. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बाजारात किराणा वस्तू, तसेच अन्य वस्तू पोच करण्यासाठी वाहने रस्त्यावर उभी करण्यात आल्यामुळे दुचाकी-चारचाकी वाहने लोकांच्या गर्दीत फसलेली पहावयास मिळाली. बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता मंत्री उमेश कत्तीं यांनी येथील भाजी बाजार राणी चन्नम्मा यार्डमध्ये शिफ्ट केला आहे. आज बाजारपेठेत आठवडी शुक्रवार बाजारासारखी गर्दी दिसून आली. गर्दीतून मार्ग काढताना दुचाकी चारचाकी वाहनधारकांचे नाके नव झालेले पहावयास मिळाले.
Check Also
वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप
Spread the love दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …