Saturday , June 15 2024
Breaking News

संकेश्वरी मिर्ची लय भारी….

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरी मिर्चीने आपला ठसका आणि झणझणीतपणा कायम राखत यंदा देखील संकेश्वरी मिर्चीने दरात नंबर वन कायम केलेले दिसताहे‌. त्यामुळे बाजारात संकेश्वरी मिर्ची लय भारी ठरली आहे. तीन दशकापूर्वी संकेश्वरी मिर्चीने अख्खी मुंबई बाजारपेठ काबीज केल्याचे आजही सांगितले जात आहे. त्यावेळी संकेश्वर राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये संकेश्वरी मिर्चीचा सौदा चालायचा. मार्केट यार्ड लालबुंद मिर्चीचा ढिगाऱ्यांनी भरुन गेलेले चित्र पहावयास मिळायचे. संकेश्वरी मिर्ची आणि लोणी मुंबईला रवाना केले जायचे. काळानुरुप संकेश्वरी मिर्चीचे उत्पादन बऱ्यापैकी घटत गेले. संकेश्वर मिर्चीचा उल्लेख आजही रेडिओवरील बाजार भावामध्ये प्रामुख्याने केला जातो आहे. संकेश्वरी चवळी मिर्चीचे उत्पादन जवळजवळ बंदच झाले आहे. आज जे कांही संकेश्वरी मिर्चीचे उत्पादन आहे. ते देखील संकेश्वरचं नाव रोशन करणार निश्चितच आहे.
संकेश्वरी मिर्ची नंबर वन..
येथील मिर्ची व्यापारी राजू बांबरे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, संकेश्वरी मिर्चीने आपले स्थान आजही नंबर वन ठेवले आहे. आजही संकेश्वरी मिर्चीचा तोच ठसका आणि झणझणीतपणा कायम आहे. तिखट झणझणीत मिर्चीपूड हवी असेल तर संकेश्वरी मिर्चीच घ्यावी लागते. संकेश्वर बाजारात संकेश्वरी मिर्चीचे उत्पादन जेमतेम असून दर प्रति किलो 400 ते 600 रुपये आहे. दुसऱ्या स्थानावर ब्याडगी काश्मिरी मिर्ची आहे. त्याचा प्रति किलो दर 350 रुपये आहे. प्रति किलो केडीएल ब्याडगी मिर्चीचा दर 300 ते 330 रुपये असून स्थानिक ब्याडगीचा दर 300 रुपये आहे. संकेश्वरातील ब्याडगी मिर्चीचा दर 270 ते 280 रुपये आहे. हुबळी येथील गरुडा जवारी मिर्चीचा दर 220 रुपये असून ही मिर्ची तिखट आणि कलरला पावरफुल्ल आहे. गुंटूर मिर्चीचा दर 170 ते 200 रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.
पसंत अपनी-अपनी...
संकेश्वर बाजारात विविध प्रकारची मिर्ची उपलब्ध असली तरी लोकांची पसंत अपनी-अपनी राहिली आहे. मिरची खरेदी करताना विशेष करुन महिलांच्या पसंतीला अग्रक्रम दिला जातो. कांही लोकांना झणझणीत तिखट मिर्चीची आवडते तर बहुतेक महिला कम तिखट आणि कलर पावरफुल्ल असलेल्या मिर्चीची निवड करतात. कांही लोक संकेश्वरी मिरचीमध्ये ब्याडगी मिक्स करून मिर्ची पूड बनवितात. बाजारात संकेश्वरी मिर्ची, गुंटूर आणि ब्याडगी मिर्चीचे नाव कायम राहिलेले दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वर बायपास रस्त्यावर वाहनांवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर बायपास रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चालत्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *