संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. भिमनगर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर सभाभवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, संकेश्वर घटक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, नगरसेवक संजय शिरकोळी, जितेंद्र मरडी, डॉ. जयप्रकाश करजगी, युवा काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी शितल मठपती, दिलीप होसमनीसह अनेक मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी नगरसेवक सचिन भोपळे, चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक, अविनाश नलवडे, मुक्तार नदाफ, मोसीन पठाण, सोयल चिकोडी, कुमार कब्बूरी, रुपसिंग नाईक, पिंटू सुर्यवंशी, संतोष सत्यनाईक, भरत नष्टी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान डॉ. बी. आर. आंबेडकर युवक मंडळाच्या सदस्यांनी महाड येथून धावत आणलेल्या भिमज्योतीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
