संकेश्वर (प्रतिनिधी) : गेल्या वर्ष दिड वर्षांपासून कत्ती बंधू आणि संकेश्वरचे उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी यांच्यात विरोधाभास निर्माण झाला होता. आता सावकारांच्या मनोमिलनाने तो दूर होताना दिसत आहे. यापूर्वीच माजी खासदार रमेश कत्ती यांनी अप्पासाहेब शिरकोळी यांच्याशी हातमिळवणी करून साथी हाथ बढाना. असेच कांहीसे सांगत विरोध शमविण्याचा यशस्वी प्रयत्न करुन दाखविला आहे. आज राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या वाहनात अप्पासाहेब शिरकोळी यांना पाहून लोक आश्चर्यचकित होऊन पहात राहिले. सावकारांची जोडी जमल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार होताना दिसत आहे. काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कत्ती बंधूंना शह देण्यासाठी अप्पासाहेब शिरकोळी यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरविण्याचा विचार चालविला होता. तो आता फोल ठरला आहे. कत्ती बंधू राजकारणात यासाठीच माहिर समजले जात आहेत. विधानसभा निवडणूक वर्षभरात होणार असल्याने त्यांनी त्याची तयारी पध्दतशीरपणे व्यूहरचना आखत चालविलेली दिसत आहे.
