संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात आज सायंकाळी मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यान्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात सभा घेऊन श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा शासकीय कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत परंपरागत पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेला उपतहसीलदार के. के. बेळवी, संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी कोरोना नियमांनुसार यात्रोत्सवाला परवानगी देता येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत यात्रा साजरी करण्याचा निर्णय उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसनगौडा पाटील, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, माजी नगरसेवक राजू बांबरे, अप्पासाहेब गस्ती यांनी जाहीर केला.
सभेच्या प्रारंभी गिरीश कुलकर्णी यांनी श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रेचा इतिहास संक्षिप्तपणे सादर केला. गेल्या पाचशे वर्षांपासून रथोत्सव यात्रा अखंडपणे साजरी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सभेला उपस्थित मान्यवरांनी यात्रेची जबाबदारी स्विकारीत यात्रोत्सव धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. सभेला राजेंद्र कणगली, महेश देसाई, बसवराज बागलकोटी उद्योजक अभिजित कुरणकर, विद्युत्त संघाचे संचालक कुणालगौडा पाटील,श्रीरामसेनेचे हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर, संतोष कमनुरी, आणप्पा संगाई, उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, डॉ. मंदार हावळ, जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, अॅड. प्रमोद होसमनी, सचिन भोपळे, माजी नगरसेवक दिपक भिसे, अविनाश नलवडे, गणपा पाटील, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
