संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजार दिवशी कमतनूर वेस, सुभाष रस्ता आणि बाजार पेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं माजी खासदार रमेश कत्ती यांनी राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये भाजी बाजार भरविणेचा घेतलेला निर्णय अगदी योग्य असल्याची चर्चा आज बाजारात लोकांतून होताना दिसली. संकेश्वरची बाजारपेठ ओस पडल्याचे सांगणारे दुकानदार परत येरे माझ्या मागल्याप्रमाणे शुक्रवार आठवडी बाजार दिवशी आपल्या दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्याकडेला किरकोळ व्यापारींना बसण्यास मज्जाव करु लागले आहेत. त्यामुळे किरकोळी व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी जगदीश ईटी यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे. मंत्रीमहोदयांनी थोडी सवलत देताच शुक्रवार आठवडी बाजाराची दिशाच बदललेली दिसत आहे. आज सायंकाळी बाजारात ट्राॅफिक जाम झालेली पहावयास मिळाली. मंत्रीमहोदयांनी भाजी बाजार पूर्ववत राणी चन्नम्मा मार्केट यार्ड मध्ये भरविण्याची मागणी लोकांतून केली जात आहे. पालिका मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी शुक्रवार आठवडी बाजाराला दिशा देण्याचे कार्य करायला हवे असल्याचे लोकांतून सांगितले जात आहे.
