Saturday , July 27 2024
Breaking News

संकेश्वरात श्री भवानी मंदिर कळसारोहण समारंभ भक्तीमय वातावरणात

Spread the love


संकेश्वर दि ( प्रतिनिधी ) संकेश्वर येथील गांधी चौक शांतवाड्यात पुरातन कालीन श्री भवानी मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोध्दार १० लाख रुपये खर्चून करण्यात आला आहे. मंदिर जिर्णोध्दारासाठी भक्तगणांनी सढळ हस्ते देणगी देऊन हातभार लावला आहे. आज संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते श्री भवानी मंदिर कळसारोहण सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.

यावेळी उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, डॉ. टी. एस. नेसरी, नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, युवानेते पवन कत्ती, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, डी. एन. कुलकर्णी, कृष्णकांत मुळे, दामोदर खटावकर, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, रोहण नेसरी, बसवराज बागलकोटी, ॲड. प्रविण नेसरी, मराठा समाज अभिवृद्धी संघ अध्यक्ष अप्पा मोरे, शंकर सपाटे, उदय नाईक, जयप्रकाश सावंत, माजी उपनगराध्यक्षा सविता सावंत, आनंद चाळके, परशराम चाळके, गणपती चाळके, रमेश चाळके, सुहास कुलकर्णी, राजू शिंदे, कृष्णा सुगंधी, पुष्पराज माने, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळसारोहण सोहळ्यानंतर भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शनिवार दि. १९ रोजी कळस मिरवणुकीला श्री शंकराचार्य महास्वामीजींनी चालना दिली. श्री शंकराचार्य संस्थान मठ ते भवानी मंदिर कळस मिरवणूक काढण्यात आली. रविवारी वास्तूशांती व उदकशांती कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सहभागी होऊन श्री भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी माजी नगराध्यक्ष गजानन क्वळी, राजेंद्र संसुध्दी, श्रीकांत हतनुरी, राजेश गायकवाड, नंदू मुडशी, चेतन बशेट्टी, सदभक्त उपस्थित होते.

मंदिराचा इतिहास

संकेश्वर गांधी चौक शांतवाडा येथील श्री भवानी मंदिराची स्थापना इ.स. १७०० मध्ये झाली असून निपाणीकर सरकारनी मंदिर उभारण्याचे कार्य केले आहे. आद्य श्री शंकराचार्य स्वामीजीनी भवानी मंदिर उभारणेस सहमती दर्शवून पूजेचा मान मिळविला आहे. श्री शंकराचार्य संस्थान मठातर्फे आजतागायत पूजेचा खर्च दिला जात आहे. देवीची पूजाअर्चा करणेचा मान शांत परिवाराला मिळाला आहे. सध्या पुरोहित म्हणून अजित शांत काम पहात आहेत.

About Belgaum Varta

Check Also

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *