
विजापूर : बसवजय मृत्युंजय स्वामीजींविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या त्रिवेणी नावाच्या महिलेने आता व्हिडिओ प्रसिद्ध करून प्रकरणाला कलाटणी दिली आहे. स्वामीजी निर्दोष असून आपली बदनामी करण्यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वक बनावट तक्रार दाखल केल्याचा दावा तिने केला आहे.
स्वामीजींविरुद्ध करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून बदनामी करण्यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वक बनावट तक्रार दाखल केल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे. आपल्या नावाचा गैरवापर करून अपप्रचार केला जात असून स्वामीजींनी कधीही असभ्य वर्तन केलेले नाही, तसेच हे नाते केवळ भक्त आणि गुरूचे असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
विजापूरमधील गोंधळाच्या वेळी केवळ चर्चेसाठी गेले होते आणि कोणत्याही पैशांची मागणी केलेली नाही, असे या महिलेने नमूद केले आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेत असून चार दिवसांनंतर प्रत्यक्ष समोर येऊन सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगत, याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महिला आयोगाला पत्र लिहून वस्तुस्थिती मांडल्याचे स्पष्टीकरण सदर महिलेने व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta