मोदींचा विरोधकाना टोला, ३३ हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचा कोनशीला कार्यक्रम
बंगळूर : बंगळुरमधील उपनगरीय रेल्वे प्रकल्पाची गेल्या ४० वर्षांपासून चर्चा सुरू आहे. पण आम्ही तसे नाही, आम्ही ४० महिन्यांत कार्यक्रम पूर्ण केले. शहरातील रेल्वे प्रकल्प काही महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
शहरातील कोम्मघट्टा येथे ३३ हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांची कोनशीला बसविल्यनंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरच्या युवा शक्ती आणि उद्योजकतेचे कौतुक केले.
डबल इंजिन सरकार सतत कार्यरत आहे. दुहेरी इंजिन सरकार बंगळूरच्या विकासासाठी, बंगळूरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत, असे मोदी म्हणाले.
आज ‘डबल-इंजिन’ सरकारच्या जलद गतीच्या विकासाच्या आश्वासनाचे आम्ही साक्षीदार आहोत. शहरात चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सरकारने आता उपनगरीय रेल्वे आणली आहे. मी ऐकले की या प्रकल्पावर १९८० पासून चर्चा होत आहे. ४० वर्षे चर्चेत गेली. मी राज्याला वचन देईन की मी ४० महिने कठोर परिश्रम करीन आणि ते प्रत्यक्षात आणेन.
कल्पना करा की हे ४० वर्षांपूर्वी केले असते तर बंगळुरचा विकास आणखी वेगाने झाला असता. हा प्रकल्प करणे माझ्या नशिबात लिहिले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रिय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास केंद्र सरकार तयार आहे, असे मोदी म्हणाले.
बंगळूर हे स्वप्नांचे शहर आहे. बंगळुरचा विकास हे तरुणांचे स्वप्न आहे. जर तुम्हाला सरकारी मदत मिळाली तर बंगळुरूमधील तरुण त्यांना हवे ते साध्य करतील. असा उद्योजकीय भाव इथे आहे. बंगळूर शहराने आत्मनिर्भर भारत शक्तीला प्रेरणा दिली आहे. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिली आहे, मी प्रत्येक क्षण तुमच्या सेवेसाठी समर्पित केला आहे. मी वेळ वाया घालवणार नाही, असे असे मोदी म्हणाले.
आम्ही राज्याला पाच राष्ट्रीय महामार्ग, सात रेल्वे, आठ वर्षांचा सातत्यपूर्ण सुधारणा कार्यक्रम दिला आहे. आम्ही १२ हजार किमीची रेल्वे लाईन बांधली आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत या घोषणेच्या पूर्ततेला बंगळूर हे एक मॉडेल आहे. गेल्या आठ वर्षांत आम्ही रेल्वे प्रकल्पांमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. स्वच्छ, सुरक्षित जनस्नेही रेल्वेत अनेक सुधारणा करण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कन्नडमध्ये करून राज्यातील आणि विशेषतः बंगळुरच्या लोकांना त्यांनी अभिवादन केले. आजचा दिवस राज्यासाठी महत्त्वाचा आहे कारण अनेक सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात मला आनंद होत आहे, असे ते कन्नडमध्ये म्हणाले. या प्रकल्पांमुळे राहणीमानात सुलभता आणि व्यवसाय करण्याची सुलभता या दोन्हींना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.