Monday , July 22 2024
Breaking News

भावसार सांस्कृतिक भवनाचे 24 व 25 नोव्हेंबरला उद्घाटन

Spread the love

 

माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची प्रमुख उपस्थिती

विजयपुर : भावसार क्षत्रिय समाजाच्या नवीन सांस्कृतिक भवनाचा उद्घाटन सोहळा 24 व 25 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भावसार समाजाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर राजेश मो देवगिरी यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, विजयपूर शहरातील बीएलडीई अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील आनंद नगरमध्ये 2.65 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन भावसार सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन निमित्त दि. 24 नोव्हेंबर रोजी वास्तुशांती व दि 25 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता वास्तू शांती होम हवन व पूजाविधी होणार असून, 7.30 वाजता भावसार क्षत्रिय समाजाच्यावतीने सराफ बाजार येथून मिरवणूक व कुंभमेळा निघणार असून ती गांधीचौक, सिद्धेश्वर मार्गे भावसार सांस्कृतिक भवन येथे पोहोचणार आहे.
समाजाचा शतकमहोत्सव व स्मरण संचिका अंकाचे प्रकाशन कार्यक्रम दुपारी 4 वाजता होणार असून गुरुवर्य हभप श्री प्रभाकरबुवा बोधले महाराज व ज्ञानयोगाश्रमाचे अध्यक्ष बसवलिंग स्वामीजी यांच्या सानिध्यात होणारा या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी भावसार क्षत्रिय समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेश देवगिरी हे राहणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर आमदार व माजी केंद्रीय मंत्री बसवनगौडा पाटील यत्नाळ, नागठाणचे आमदार विठ्ठल कटकदोंड, विधान परिषदेचे माजी सदस्य नारायणसा भांडगे, जयप्रकाश अंबरकर, सुरेश बुलबुले उपस्थित राहणार आहेत.
25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नूतन सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात येणार आहे. कणेरीमठ काडसिद्धेश्वर स्वामीजी व हभप जयंतराव बोधले महाराज व हर्षानंद स्वामीजी यांच्या सानिध्यात होणारा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजाचे अध्यक्ष राजेश देवगिरी हे भूषविणार असून खासदार रमेश जिगजिनगी, मंत्री शिवानंद पाटील, माजी उपमुख्यमंत्री गोविंदा कारजोळ, एआयबीकेम राष्ट्रीय अध्यक्ष राजू जवळकर, किशनराव गडाळे, कर्नाटक राज्य अध्यक्ष श्रीनिवास पिसे, के. जी. टिकरे, रमेश तापसे, सुदर्शन सुलाखे, आमदार अशोक मनगोळी, आप्पासाहेब पटनशेटी, नानागौडा बिरदार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेला भावसार क्षत्रिय समाजाचे उपाध्यक्ष मिलन मिरजकर, सचिव दिपक शिंत्रे, युवक समिती अध्यक्ष विशाल पुकाळे, महिला मंडळाच्या अध्यक्षा पद्माताई इजंतकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटकातील काही जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर

Spread the love  बंगळुरू : कर्नाटक राज्यात पावसाचा जोर कायम आहे. घाट परिसरात मुसळधार पाऊस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *