नवी दिल्ली : पैलवान सागर धनकड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुशीलकुमार याच्या न्यायालयीन कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ करण्याचे निर्देश महानगर दंडाधिकारी रितिका जैन यांनी शुक्रवारी दिले. संपत्तीच्या वादातून सुशीलकुमारने त्याच्या काही सहकाऱ्यांसमवेत सागर धनकड याची ४ मे रोजी बेदम मारहाण करून हत्या केली होती.
ऑलिम्पिक स्पर्धेत दोनवेळा पदक पटकाविलेला सुशीलकुमार हा नामांकित मल्ल आहे. सागर धनकड याला बेदम मारहाण केली जात असल्याचे व्हिडिओ चित्रण असून त्याच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचे पोलिसांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. हत्या प्रकरणानंतर सुशीलकुमार फरारी झाला होता, मात्र 23 मे रोजी पोलिसांनी अजयकुमार सेहरावत नावाच्या आरोपीसह सुशीलला अटक केली होती. हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दहा आरोपींना अटक केलेली आहे.
Check Also
तिबेटला भूकंपाचा तडाखा; 53 जणांचा मृत्यू
Spread the love तिबेट : नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका …