येळ्ळूर : पर्यावरण दिनानिमित्त आज परमेश्वर मंदिर येळ्ळूर येथे बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण व झाडे वाटप सामाजिक कार्यकर्ते श्री. विरेश हिरेमठ यांच्यावतीने साजरा करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष श्री. सतीश पाटील होते.
सतीश पाटील बोलताना म्हणाले की, विरेश हिरेमठ यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. आज प्रत्येकालच ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्यासाठी प्रत्येकाने दरवर्षी एक झाड लावावे आणि त्याचे जतन करावे असा संदेश विरेश हिरेमठ जनतेला देत आहेत. तसेच येळ्ळूर ग्राम पंचायतीच्यावतीने हिरेमठ यांचे आभार मानले व त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास येळ्ळूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष सौ. लक्ष्मी मासेकर, प्रमोद पाटील, सौ. सुवर्णा बिजगरकर, सौ. पार्वती राजपूत, सौ. रूपा पुण्यन्नवर, शशी धुळजी व इतर नागरिक उपस्थित होते.