खानापूर (प्रतिनिधी) : योगा, प्राणायामचे धडे आता खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमध्ये खानापूर पतंजली योग समितीच्यावतीने नुकताच पार पडले. या प्रशिक्षणाचे धडे योग समितीचे योग शिक्षक अरविंद कुलकर्णी व आकाश अथणीकर यांनी यावेळी रूग्णाना शिकविले.
यावेळी अनेक रूग्णानी योगासन व प्राणायाम कार्यक्रमात सहभागी झाले होते. योगा व प्राणायाममुळे रूग्णाना नव चैतन्य मिळाले. त्यामुळे त्यांना चांगले आरोग्य ही लाभले त्यामुळे रूग्णातून समाधान पसरले.
यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष व भाजप नेते किरण येळ्ळूरकर, सेक्रेटरी सदानंद पाटील व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …