Monday , March 17 2025
Breaking News

Spread the love

Goa AAP : “काॅंग्रेसला मत देणं म्हणजे भाजपला मत देण्यासारखं”

पणजी: आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल काॅंग्रेसवर निशाणा साधत म्हटलं आहे की, “गोव्यात काॅंग्रेसला मत देणं म्हणजे अप्रत्यक्ष भाजपाला मत देण्यासारखं आहे. त्यामुळे गोव्याची लढाई ही आप आणि भाजपा यांच्यात आहे.” काॅंग्रेस नेते भाजपामध्ये प्रवेश करताहेत, त्यांच्या या प्रवृत्तीवरून केजरीवाल यांनी हे विधान केलं आहे.

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपलं मत मांडलं आहे. गोव्याच्या जनतेला आवाहन तर केजरीवाल म्हणाले की, “भाजपाला बाहेर घालविण्यासाठी ‘आप’ला मतदान करा. भाजप आणि आप यांमध्ये तुमच्यासमोर एक पर्याय आहे. जर तुम्हाला स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार हवी असेल, तर आपला मतदान करा. कारण, काॅंग्रेसला मतदान करणं म्हणजे भाजपाला अप्रत्यक्ष मतदान करण्यासारखं आहे.”

“जर तुम्ही काॅंग्रेसला मतदान केलं, तर काॅंग्रेस जिंकेल. पण, ती भाजपासोबत सहभागी होतील. गोव्यातील आमचे सर्व उमेदवार प्रामाणिक आहेत. पण, ते सांगण्यासाठी आम्हाला प्रचारपत्रकात तसं सांगावं लागेल. २०१७ नंतर आमचे उमेदवार लोकांच्या जवळ गेले, त्यांच्याशी संवाद साधला. ही काळ कोरोनाचा होता. त्यावेळी आपने संपूर्ण देशातून वर्गणीतून पैसा गोळा केला आणि गोव्याच्या जनतेपर्यंत पोहोचविला. त्यावेळी काॅंग्रेस आणि भाजपा कुठं होती”, असंही मत त्यांनी मुलाखतीत मांडलं.

१४ फ्रेब्रुवारीला गोव्यात मतदान होणार आहे. ४० विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षांचे उमदेवार उभे राहिलेले आहेत. १० मार्चला गोव्याच्या मतदानाचे निकाल लागणार आहेत. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघावर ‘आप’ने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. तसेच भाजपा, काॅंग्रेस यांनीही गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चांगलीच कंबर कसली आहे.

About Belgaum Varta

Check Also

उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश

Spread the love    नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन होऊन 57 मजूर अडकले आहेत. त्यापैकी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *