Saturday , July 27 2024
Breaking News

Spread the love

गोवा आतागोल्डन गोवाबनण्याच्या मार्गावर

विविध योजनांच्या माध्यमातून गोवा आता गोल्डन गोवा बनण्याच्या मार्गावर आहे. भारतमाला प्रोजेक्टच्या माध्यमातून गोव्याचा खऱ्या अर्थाने कायपालट करणार असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटले.

Goa Election: गोवा आता 'गोल्डन गोवा' बनण्याच्या मार्गावर

गोवा-आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये गोव्याचा देखील समावेश आहे. याच पाश्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी म्हापश्याच्या जाहीरसभेतून कुणावर हल्लाबोल करणार याची उत्सुकता अवघ्या राज्याला लागून राहीली आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आणण्यासाठी पंतप्रधान मोदी गोवेकरांना आकर्षित करण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून गोवा आता गोल्डन गोवा बनण्याच्या मार्गावर आहे. भारतमाला प्रोजेक्टच्या माध्यमातून गोव्याचा खऱ्या अर्थाने कायपालट करणार असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटले.

दरम्यान ते पुढे म्हणाले, ‘जेव्हा आम्ही पर्य़टनावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा विकास होतो. आम्ही गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी काम करत आहोत. त्याचबरोबर पर्यटकांच्या मनामध्ये गोव्याप्रती विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्यात जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा 25 लाख पर्य़टक यायचे मात्र राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर 2019 मध्ये ही संख्या 80 लाखांपेक्षा जास्त झाली.’

शिवाय, ते पुढे म्हणाले, ‘गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अभूतपूर्व काम करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनंमध्ये गोवा प्रथम क्रमांकावर आहे. मुख्यमंत्र्यांनी योजनांच्या माध्यमातून गोवेकरांचा खऱ्या अर्थाने विकास केला.’

Koo App

#गोवा विधानसभा निवडणुक २०२२ प्रचार निमित्त #काणकोण मतदारसंघातील चावडी याठिकाणी उपस्थित असताना गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माझ्यासह उमेदवार रमेशजी तवडकर , माजी आमदार सुनिलजी हेगडे , भाजप गोवा प्रदेश सचिव सर्वानंद भगतजी व नगराध्यक्ष सायमनजी रिबेलो व आदी मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @BJP4Goa #GoaElections2022 #Goa #BJP #Vote4BJP

Ganpat Gaikwad (@mlaganpatgaikwad) 11 Feb 2022

Koo App

#गोवा विधानसभा निवडणुक २०२२ प्रचार निमित्त माननीय #पंतप्रधान #नरेंद्रजी_मोदी यांनी #म्हापसा येथे जनसंकल्प सभेला संबोधित केले. #काणकोण मतदारसंघातील #चावडी या ठिकाणी एलईडी स्क्रिनवर सभेचे थेट प्रसारण करण्यात आले होते. मोदीजींच्या संबोधनापूर्वी माझ्यासह उमेदवार रमेशजी तवडकर , माजी आमदार सुनिलजी हेगडे, भाजप गोवा प्रदेश सचिव सर्वानंद भगतजी व नगराध्यक्ष सायमन रिबेलोजी आदींनी भाषणे केली.

Ganpat Gaikwad (@mlaganpatgaikwad) 11 Feb 2022

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *