Sunday , July 26 2026
Breaking News

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बस तक्रारीची परिवहन महामंडळाकडून दखल

Spread the love

बेळगाव : दिनांक ०८/०२/२०२२ रोजी मच्छे येथे परिवहन मंडळाच्या बसला विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत होते. या संदर्भात म. ए. युवा समितीने हुबळीच्या परिवहन महामंडळकडे ट्विटरद्वारे तक्रार करून अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणी केली होती आणि कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता.

युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता, लांब पल्ल्याच्या बसेस बस थांब्यावर थांबत नाही आणि स्थानिक बसेसच्या अनियमित सेवा मुळे बस थांब्यावर विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत थांबावे लागते, आणि मिळेल त्या बस ने जीव धोक्यात घालून बसेस ना लटकून कॉलेज ला पोहचावे लागते.
काल दिनाक १०/०२/२०२२ रोजी परिवहन मंडळाकडून कोणत्या वेळेत आपणास बसेस हव्या आहेत आम्ही बसची आणखीन एक फेरी वाढवून देऊ अशी माहिती परिवहन मंडळाने म. ए. युवा समितीला दिली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने देसूर, लक्ष्मी नगर व मच्छे येथील थांब्यावर सकाळी ०७:३० ते १० पर्यंत आणि संध्याकाळी ४ ते ६ पर्यंत तासाला एक वाढीव फेरी आणि अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणी केली तसेच लांब पल्ल्याच्या बसेसना वरील थांब्यावर विद्यार्थ्यां साठी थांबण्याची सूचना करावी अशी मागणी केली आहे. याबाबत बेळगावच्या परिवहन कार्यालयाला निर्देश दिले जातील अशी माहिती हुबळी येथील व्यवस्थापकांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *