Saturday , July 27 2024
Breaking News

कुंकळ्ळीत तृणमूल, भाजप आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार

Spread the love

कुंकळ्ळीत तृणमूल, भाजप आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार

कुंकळ्ळीतील सर्व जाहीरसभा खचाखच

 

Goa Election 2022: Will BJP Emerge As The Big Fish Amid Challenges From TMC, AAP & Congress

कुंकळ्ळी: कुंकळ्ळी मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजप, तृणमूल व काँग्रेस पक्षाने जोर लावला आहे. प्रचार संपुष्टात येण्याला अवघे काहीच तास उरले असताना शुक्रवारी भाजप, तृणमूल व कॉंग्रेस पक्षाने जाहीर सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करीत ‘हम भी कुछ कम नहीं’ असे दाखवून दिले.

तृणमूल काँग्रेसने बस स्थानकाजवळ खुल्या मैदानावर जाहीर सभेद्वारे मोठी गर्दी जमवून आपणच हुकमाचे दावेदार असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. भाजपने कुंकळ्ळी बाजारात पिकअप स्टॅन्डजवळ भव्य जाहीर सभा घेऊन ‘आप’ला धडकी भरवली. तर काँग्रेसने माड्डीकटा येथे जाहीर सभा घेऊन ताकद दाखवून दिली. तिन्ही पक्षांच्या जाहीर सभांना जनतेची खचाखच गर्दी होती. या सभांमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांचा जोश पाहून कुंकळ्ळी मतदारसंघात लढत रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

डॉ. जॉर्सन फर्नांडिस यांच्या प्रचारार्थ आयोजित तृणमूलच्या जाहीर सभेलाही मोठी गर्दी होती. संपूर्ण मंडप गच्च भरला होता. युरी आलेमाव यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेलाही मतदारांचा मोठा पाठिंबा लाभला. भाजपच्या जाहीर सभेला भाजपचे राष्ट्रीय नेते तेजस्वी सूर्या यांनी आमदार क्लाफास डायस यांना आणखी एक संधी देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, गोव्यात भाजपाचे सरकार स्थापन करण्यासाठी कुंकळ्ळीच्या मतदारांनी सहकार्य करावे.

आमदार क्लाफास डायस व इतर नेत्यांनी भाजपच्या विकासकामांचा आलेख उलगडून दाखविला. या वेळी क्लाफास डायस यांनी आपला जाहीरनामा जनतेपुढे ठेवला.

तृणमूल काँग्रेसचे उमेदवार डॉ. जॉर्सन यांच्यासाठी तृणमूलचे खासदार डेरीक ओब्रायन यांनी मतांचा जोगवा मागितला. तृणमूल पक्ष गोव्यात पर्यटनासाठी आलेला नसून गोमतकीयांना त्यांचे हक्क व मान देण्यासाठी आलेला आहे. तृणमूल गोव्यात आगामी लोकसभा निवडणूकही लढवणार असल्याचे ओब्रायन म्हणाले.

डॉ. जॉर्सन यांच्या सारख्या उच्च शिक्षित उमेदवारास कुंकळ्ळीकरांनी संधी द्यावी,असे आवाहन डेरीक ओब्रायन यांनी केले.तृणमूल ने गोमंतकीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास व महिला सशक्तिकरणासाठी तृणमूलला संधी देण्याचे आवाहन डेरीक ओब्रायन यांनी केली यावेळी माजी आमदार फेरले फुर्तादो, माजी नगराध्यक्षा पेंजी कुतिन्हो उमेदवार डॉ. जॉर्सन फर्नांडिस यांनी तृणमूलच्या भावी योजनांची माहिती दिली.

काँग्रेसचे उमेदवार युरी आलेमाव यांच्यासाठी कॉंग्रेसच्या प्रभारी रागिणी नाईक, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व इतर नेत्यांनी मते मागितली. युरी आलेमाव यांनी यावेळी आपण करणार असलेल्या कामाची माहिती दिली. तिन्ही उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत आहेत. मात्र, प्रचारात तिन्ही उमेदवारांना लाभत असलेला पाठिंबा पाहून ही लढत कोणासाठीही सोपी नसून लढत रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे.

स्वच्छ प्रशासनासाठी भाजपच योग्य : सूर्या

देशात मोदी व राज्यात डॉ. सावंत सरकारने स्वच्छ व विकासाभिमुख सरकार चालवून एक उदाहरण घालून दिले आहे. राज्याच्या विकासासाठी व स्वच्छ प्रशासनासाठी डबल इंजिनच्या भाजप सरकारमध्ये भागीदार होण्यासाठी भाजपचे उमेदवार क्लाफास डायस यांना संधी देण्याचे आवाहन तेजस्वी सूर्या यांनी मतदारांना केले.

मुस्लिम महिलांची उपस्थिती लक्षणीय

भाजपने कुंकळ्ळी मतदारसंघात या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेक जाहीर सभा घेतल्या. मात्र, शुक्रवारच्या सभेला झालेली अभूतपूर्व गर्दी व उत्साह या पूर्वी कधीच पहायला मिळाला नव्हता. महत्वाचे म्हणजे भाजपच्या सभेला प्रथमच हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम महिलांची व ख्रिस्ती मतदारांची मोठी उपस्थिती जाणवली.

 

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *