खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मंग्यानकोप ग्राम पंचायतीच्या हद्दीतील शिवाजी नगरात गोमारी तलाव गेल्या ७० वर्षापूर्वी उभारण्यात आला. गोमारी तलाव तालुक्यात आकाराने मोठा आहे. शिवाय गोमारी तलावाची प्रसिद्धी मोठी आहे
या तलावला जोडलेल्या गस्टोळी कॅनल नुकताच कोसळला. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या शेतीला होणार पाणी पुरवठा बंद झाला आहे.
गोमारी तलाव हा जवळपास ८०० ते १००० हेक्टर जमिनीत विस्तारला आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर भुरूनकी, मंग्यानकोप, कक्केरी, चुंचवाड आदी ग्राम पंचायतीच्या हद्दीतील अनेक खेड्याना होत आहे.
त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाला गोमारी तलाव म्हणजे वरदान ठरला आहे. गोमारी तलावात बाराही महिने पाणी भरून राहते. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाला वर्षभर पाण्याची समस्या नसते. वर्षभर पिके घेतली जातात.
त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग सुखी समाधानी आहे.
याभागातील शेतकरी भात, ऊस पिकाबरोबर भाजीपाला, व इतर फळाचे उत्पन्न घेतो. त्यामुळे वर्षभर शेतकरी वर्गाला उत्पन्न मिळते.
मात्र नुकताच कोसळलेल्या गस्टोळी कॅनलमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.
गस्टोळी कॅनल सरकारने त्वरित उभारून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा. तसेच तालुक्याच्या आमदारानी याची पाहणी करुन गस्टोळी कॅनलची त्वरीत उभारणी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.