खानापूर (प्रतिनिधी) : सध्या बेळगाव-लोंढा रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे असोगा खानापूर मार्गावरील येणाऱ्या रेल्वे गेटचे काम शनिवारपासुन सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या रेल्वेगेटवरून वाहतुक करणे शक्य नाही. यासाठी असोगा भागातुन खानापूरला येणाऱ्या वाहनधारकांना तसेच नागरिकांना रेल्वे खात्याकडुन आसोगा खानापूर रेल्वे गेट येत्या १० दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तेव्हा नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे खात्याचे इंजिनिअर श्री. शशिधर यांनी केले आहे.
शनिवारी दि. १२ रोजी सकाळपासुन दोन तासाहुन काळ आसोगा रेल्वे गेट बंद ठेवण्यात आल्याने एका आजारी व्यक्तीला त्रास सहन करावा लागला. यावेळी असोगा भागातील नागरिकांतुन नाराजी पसरली. लागलीच रेल्वे खात्याचे इंजिनिअर श्री. शशिधर यांची नागरिकानी संपर्क साधुन समस्या मांडल्या.
यावेळी इंजिनिअर श्री. शशिधर यांनी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यासाठी तुम्हाला दोन तास जेसीबी देऊन बाचोळी कच्चा रस्त्याची दुरूस्ती करा. तो पर्यंत असोगा खानापूर रस्त्यावरील रेल्वेगेटचे येत्या १० दिवसात काम पूर्ण करून रेल्वे गेट वाहतुकीला मोकळे करतो, असे आश्वासन दिले.
शनिवारी दोन तासानंतर काही काळ रेल्वे गेट वाहतुकीला मोकळे केले. परंतु पुढील १० दिवस असोगा रेल्वे गेट वाहतुकीला बंद राहणार आहे. याची असोगा भागातील जनतेने नोंद घ्यावी. तसेच बाचोळी रस्ता पर्यायी व्यवस्था करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
असोगा रेल्वे गेटला लागुनच अंडर ग्राऊंड ब्रीजला मंजुरी मिळाली आहे. येत्या मे महिण्या अखेर अंडर ग्राऊंड ब्रीज होईल. असा विश्वास रेल्वे इंजिनिअर श्री. शशिधर यांनी दिला.
यावेळी विजय होळणकर, दिपक तिनेकर, भाजप नेते राजेन्द्र रायका, ग्राम पंचायत सदस्य रिचर्ड, महादेव पाटील, कल्लापा पाटील, उमेश गावकर तसेच असोगा भागातील अनेक खेड्यातील नागरिक उपस्थित होते.
