Saturday , July 27 2024
Breaking News

गोव्यात करोडपती मंत्र्यांच सरकार

Spread the love

गोव्यात करोडपती मंत्र्यांच सरकार; कोण आहे किती कोटीचा धनी माहितीये

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे.

गोव्यात करोडपती मंत्र्यांच सरकार; कोण आहे किती कोटीचा धनी माहितीये

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सावंत यांच्यासह आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा तसेच अनेक भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. नव्या मंत्रिमंडळातून चार जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आले. त्याच वेळी, तिघे पुन्हा मंत्रिमंडळात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे, सावंत यांच्या मंत्रिमंडळात पाच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. गोव्याच्या नव्या सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री किती शिक्षित आहेत? या मंत्र्यांकडे किती संपत्ती आहे? प्रमोद सावंत यांचे मंत्रिमंडळ वयानुसार कसे? जाणून घेऊया…

दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात चार जुन्या चेहऱ्यांना स्थान मिळाले नाही. यामध्ये जेनिफर मोन्सेरात, फिलिप रॉड्रिग्ज, मायकेल लोबो आणि दीपक पळसकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चौघांपैकी तिघांनी पक्ष सोडला आहे. त्याचबरोबर मागील सरकारच्या एकमेव महिला मंत्री असलेल्या जेनिफर मोन्सेरात यांना विजय मिळवूनही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. मायकल लोबो निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्याचवेळी फिलिप रॉड्रिग्स यांनीही पक्ष सोडून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. तिकीट न मिळाल्याने दीपक पळसकर यांनी पक्ष सोडला होता. तर दुसरीकडे, मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळालेल्या मंत्र्यांमध्ये विश्वजित राणे माविन कुदिन्हो आणि नीलेश काब्राल यांचा समावेश आहे.

सावंत यांच्या नव्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री कोट्यधीश आहेत. कोणत्याही मंत्र्याची संपत्ती 2.67 कोटी रुपयांपेक्षा कमी नाही. गोविंद गावडे हे सावंत मंत्रिमंडळात सर्वात कमी मालमत्ता असलेले मंत्री आहेत. 2017 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेले गावडे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 50 वर्षीय गावडे यांच्याकडे 2.67 कोटींची संपत्ती आहे. तर त्यांच्यावर 29 लाखांहून अधिकचे दायित्वही आहे. अटानासिओ मोन्सेरात हे मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. मॉन्सेरात यांची एकूण संपत्ती 48.48 कोटी रुपये आहे.

तर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्याकडे 9.37 कोटींची संपत्ती आहे. सावंत हे त्यांच्या मंत्रिमंडळातील तिसरे सर्वात कमी मालमत्ता असलेले मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील उर्वरित पाच मंत्र्यांची संपत्ती 10 कोटींहून अधिक आहे. सावंत मंत्रिमंडळाची सरासरी मालमत्ता 19.49 कोटी रुपये आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि फोंड्यातून विजयी होऊन मंत्री झालेले रवी नाईक हे मंत्रिमंडळातील सर्वाधिक शिक्षित मंत्री आहेत. दोघांनीही मास्टर्स केले आहे. सावंत यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथून सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याचबरोबर नाईक यांनी राज्यशास्त्रात एम.ए. उर्वरित सात मंत्र्यांपैकी दोन पदवीधर, दोन बारावी उत्तीर्ण आणि तिघांनी पदवी प्राप्त केली आहे. सुभाष शिरोडकर आणि सर्वात श्रीमंत आमदार अतानासिओ मोन्सेरात हे मंत्रिमंडळातील सर्वात कमी शिक्षित मंत्री आहेत. दोघेही बारावी पास आहेत.

मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा समावेश आहे. 48 वर्षांचे असलेले सावंत हे मंत्रिमंडळातील दुसरे सर्वात तरुण मंत्री आहेत. रोहन खंवटे हे मंत्रिमंडळातील सर्वात तरुण चेहरा आहेत. खवंटे, 47, आणि सावंत, 48, याशिवाय 49 वर्षीय निलेश काब्राल हे 50 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मंत्री आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे सरासरी वय 56.66 वर्षे आहे. तीन मंत्री 50 च्या आत आहेत, तर तीन मंत्री 50 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहेत. 60 ते 70 च्या दरम्यान दोन मंत्री आहेत. त्याच वेळी, 75 वर्षांचे रवी नाईक (Ravi Naik) हे सर्वात वयोवृद्ध मंत्री आहेत. 70 वर्षीय सुभाष शिरोडकर आणि 62 वर्षीय माविन कुदिन्हो हे तीन ज्येष्ठ मंत्री आहेत. चार मंत्री गुन्हेगारी पाश्वभूमीचे आहेत. सर्वात श्रीमंत आमदार अतानासिओ मोन्सेरात यांच्यावर सर्वाधिक तीन गुन्हेगारीचे प्रकरणे आहेत.

 

Koo App

गोवा सरकार के दूसरे कार्यकाल की मा0 मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत जी एवं समस्त मंत्रिपरिषद के सदस्यों को हार्दिक बधाई एवं उज्ज्वल कार्यकाल की शुभकामनाएं। निश्चित ही आने वाले 5 वर्षों में गोवा की भाजपा सरकार जनता जनार्दन की अपेक्षाओं के अनुरूप प्रदेश में विकास के नए कीर्तिमान स्थापित करेगी।

Keshav Prasad Maurya (@kpmaurya1) 28 Mar 2022

Koo App

प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी की उपस्थिति में आज गोवा के मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत जी के शपथ ग्रहण समारोह में शामिल होकर उन्हें पुन: मुख्यमंत्री बनने की बधाई दी। उनके नेतृत्व में प्रदेश विकास के पथ पर चलकर नित नए आयाम स्थापित करे तथा हर गोवावासी समृद्ध हो, ऐसी कामना करता हूँ।

Manohar Lal (@manoharlalbjp) 28 Mar 2022

Koo App

डॉ. श्री प्रमोद सावंत जी को पुनः गोवा के मुख्यमंत्री के रूप में शपथ लेने पर हार्दिक बधाई। मुझे विश्वास है, कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में और आपके नेतृत्व में गोवा के लोगों की आकांक्षाओं को पूरा करने की दिशा में भाजपा सरकार काम करना जारी रखेगी। श्री सावंत जी को आगे के कार्यकाल के लिए मेरी शुभकामनाएं। @DrPramodPSawant

Nitin Gadkari (@nitin.gadkari) 28 Mar 2022

Koo App

पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल डॉ. श्री प्रमोद सावंत जी यांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या सहकार्याने खेचून आणलेल्या विजयश्रीवर आपण पुन्हा एकदा गोव्यात भाजपचे सरकार प्रस्थापित करत आहात, ही आनंदाची बाब आहे. @DrPramodPSawant @Dev_Fadnavis

Narayan Rane (@menarayanrane) 28 Mar 2022

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *