Thursday , June 20 2024
Breaking News

‘अंकुरम्’ 6 रोजी उद्घाटन रोजी स्कूलच्या स्वइमारतीचे उद्घाटन

Spread the love
परमात्मराज महाराजांची उपस्थिती : सेक्रेटरी अमर चौगुले यांची माहिती
निपाणी(वार्ता) : येथील कला निकेतन एज्युकेशन सोसायटीने अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलसाठी कोडणी रोड येथे स्वइमारत बांधली आहे. या स्कूलचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी राजीव जी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सातारा येथील इंद्रजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी अमर चौगुले यांनी दिली.
 2018 साली या संस्थेची सुरुवात झाली. नर्सरी ते पाचवी पर्यंत च्या वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दोन वर्षात सीबीएससी स्कूल ला मान्यता घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्याचा संस्थेचा मानस आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी क्रीडाकडून साहित्य खरेदी करण्यात आले आहे विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास करण्यासाठी प्रॅक्टिकल आधारित शिक्षण दिले जाणार आहेत मुलांचा बुद्ध्यांक चांगला आहे त्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीचे शिक्षण प्रणाली क्रियाकलाप ॲक्टिविटी बेस शिक्षण दिले जाणार आहे. अर्धा एकर खेळाचे मैदान बनवले असून तेथील शारीरिक विकास  करण्यावर भर दिला जाणार आहे. पूर्वप्राथमिक शिक्षण हे बॅग लेस व होमवर्क न देता शिकवले जाणार आहे अन कुरम म्हणजे बीजापासून रोपटे वाढवण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या येथे शंभर मुले शिक्षण घेत आहेत गुढीपाडव्यापासून प्रवेश सुरू होणार आहेत. संस्थेतर्फे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल नर्सिंग व फार्मसी कोर्स सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. संस्थेमध्ये पदवीधारक शिक्षकांची नियुक्ती केली असून सर्व दर्जेदार शिक्षण देणे हा उद्देश आहे सुसज्ज अशी संगणक लॅब उभारली असून सुरूवातीपासूनच संगणक शिक्षण तसेच म्युझिक शिक्षण दिले जाणार आहे विद्यार्थ्यांना इंग्रजी बरोबरच कन्नड, हिंदी व मराठी विषयाचे ज्ञान दिले जाणार आहे. संस्कृतमधून श्लोक पठण करून घेतले जाणार आहेत विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय केली आहे. दरवर्षी पाच विद्यार्थ्यांना शिक्षण सवलत व गणवेश मोफत दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना समजेल उमजेल अशा भाषेत शिक्षण देण्यासाठी या संस्थेचा प्रयत्न राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष चेतना चौगुले, डॉ. ज्योतिबा चौगुले, डॉ. उत्तम पाटील, डॉ. बलराम जाधव, संदीप ननावरे, विनायक कुंभार, सतीश चौगुले, चंद्रकांत खोत, अमित पाटील या संचालकांची उपस्थिती होती.

About Belgaum Varta

Check Also

जत्राटवेस- लखनापूर पुलाचे काम करा

Spread the love  नागरिकांचे निवेदन; पालकमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : जत्राटवेस लखनापूर केसरकर मळा मार्गावरील ओढ्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *