तांत्रिक सल्लागार समितीचा मुख्यमंत्र्यांना अहवाल
बंगळूरू : राज्यात लॉकडाऊनमध्ये वाढ बहूतेक निश्चित आहे. येत्या 13 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन वाढविण्यासंबंधात तांत्रिक सल्ला समितीने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना आपला अहवाल सादर केला आहे. अहवालामध्ये लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आल्याचे समजते.
राज्यात सध्या सात जूनपर्यंत लॉकडाऊन जारी आहे. त्यानंतर एका आठवड्याने म्हणजेच 13 जूनपर्यंत लॉकडाऊनचा विस्तार करणे योग्य होईल, त्यामुळे संसर्ग प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होईल, असे तज्ञानी आपल्या अहवालात म्हटले असल्याचे समजते.
सात जूननंतर अचानक लॉकडाऊन शिथील केल्यास कोरोना संसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात कोरोना संसर्ग अद्याप नियंत्रणात आलेला नाही. यासाठी लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा सल्ला तज्ञ समितीने दिला असल्याचे समजते.
तांत्रिक सल्लागार समितीचे तज्ञ देखील एका आठवड्यासाठी सेमीलॉकडाऊन वाढविण्यास अनुकूल आहेत, ज्यांना 13 जूननंतर दर आठवड्याला तज्ञाकडून अहवाल घेतला पाहिजे. तज्ञांच्या अहवालाच्या आधारे आर्थिक व्यवहारात शिथिलता करावी. शहरी भागात कोरोना नियंत्रित होत आहे, परंतु ग्रामीण भागात प्रमाण वाढतच आहे. मृत्यूचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. यासाठी तज्ञांनी आनखी एक आठवडा लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
अशा प्रकारे, 7 जूननंतर एका आठवड्यासाठी राज्यात लॉक जवळजवळ निश्चित आहे.
तज्ञांची माहिती
तांत्रिक सल्लागार समितीने लॉकडाऊन सुरू ठेवण्यास व अनलॉक करण्यासंबंधात कोणताही अहवाल दिलेला नाही, अशी माहिती तांत्रिक सल्लागार समितीच्या सदस्यांनी दिली. सल्लागार समितीचे सदस्य डॉ. सी. एन. मंजुनाथ आणि डॉ. व्ही. रवी यांनी, लॉकडाऊन शिथील करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे सांगितले.
याबाबत बोलताना डॉ. मंजुनाथ म्हणाले, सध्या लॉकडाऊन असावा की नाही, याबद्दलचे विश्लेषण चालू आहे. अजून वेळ आहे. जर 10 हजारपेक्षा कमी प्रकरणे असतील तर अनलॉक टप्याटप्याने शिथील करण्यात यावा. सध्या रोज 20 हजारपर्यंत प्रकरणांची संख्या वाढत आहे. सकारात्मकतेचा दर 10 टक्यापेक्षा कमी असावा.
डॉ. व्ही. रवी म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी 5 जूनला बैठक बोलाविली आहे. बैठकीत आमचे मत आम्ही मांडू. तांत्रिक सल्लागार समितीद्वारे सध्यातरी कोणताही निर्णय झालेला नाही. माझे वैयक्तिक मत आहे की, जेव्हा सकारात्मकतेचा दर 5 टक्यापेक्षा कमी असतो तेव्हाच अनलॉक केला जातो. तांत्रिक सल्लागार समितीने सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे.
टप्याटप्याने शिथीलीकरण
राज्य सरकार लॉकॉडाऊन टप्या-टप्याने शिथील करणार असल्याचे मंहसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले. तथापी संक्रमणाची संख्या कमी न झाल्यास लॉकडाऊन चालूच राहील, असा त्यांनी इशारा दिला. कोरोना संक्रमण कमी झाल्याशिवाय निर्बंध हटविण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.