Thursday , November 14 2024
Breaking News

4 लाख 70 हजारची दारु जप्त, आजरा पोलीसांची मोठी कारवाई

Spread the love

महिन्याभरात तिसरी कारवाई, 11 लाख 22 हजारांची दारु जप्त

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : येथील आजरा आंबोली रोडवर तुळसी धाब्याजवळ आजरा पोलीसांनी कारवाई करत 4 लाख 70 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे.

याप्रकरणी शिवाजी ग्यानबा भुते व गणेश महादेव पिंगळे (दोघे रा.खर्डा, ता. जामखेड, जि.अहमदनगर) यांच्यावर कारवाई केली आहे. हे दोघे आपल्या टाटा टेम्पो (नं. MH 42 B 9873) मधून गोवा बनावटीची दारु बेकायदेशीररित्या वाहतूक करत होते. गवसे जवळील तुळशी धाब्याजवळ या टेम्पोला पोलीसांनी अडवून तपासणी केली असता गाडीच्या हौदात सुमारे 4 लाख 70 हजारांची गोवा बनावटीची दारु आढळून आली. यामध्ये मॅकडॉनल नं. १ चे 121 बॉक्स (किंमत रु.3 लाख 71 हजार 712) व रॉयल व्हिस्की चे 24 बॉक्स (किंमत 97 हजार 920) या दारुप्रकाराचा समावेश आहे. गाडीसह 9 लाख 75 हजार 132 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आजरा पोलीसांची या महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. धामणे- बेलेवाडी रस्त्यावर एका कारवाईत 1 लाख 19 हजाराची दारु तर गवसे जवळील तुळशी धाब्याजवळ दोनवेळा कारवाई करत 10 लाख 4 हजारांची गोवा दारु जप्त केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कोल्हापूर जिल्ह्यातील 9 हजार 689 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले पोस्टल मतदान

Spread the love  कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *