Sunday , September 20 2026
Breaking News

उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा पश्चिम महाराष्ट्रात

Spread the love

 

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून (१४ ऑक्टोबर) बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत आहे. यात्रेचा उद्यापासून हा शेवटचा टप्पा असेल. या यात्रेची सांगता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर या मतदारसंघांमध्ये होणार आहे. सांगता सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, येत्या आठवड्यामध्ये विधानसभेसाठी बिगुल फुंकले जाण्याची शक्यता आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्रा १४, १५ आणि १६ तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल.

इचलकरंजी आणि कागलमध्ये शिवस्वराज यात्रा जाणार
उद्या १४ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांचा पक्षप्रवेश फलटणमध्ये होणार आहे. यात्रेतच हा पक्षप्रवेश होईल. या पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा उपस्थित असणार आहेत. १५ तारखेला यात्रा इचलकरंजीमध्ये पोहोचेल. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी आणि कागलमध्ये अशा दोन मतदारसंघांमध्ये ही शिवस्वराज यात्रा जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

ग्रामीण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ

Spread the love  “कलापुरीचे कलादालन” करवीरवासीयांच्या सेवेत रुजू कोल्हापूर : सौ. अपर्णा चव्हाण व श्री. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *