Sunday , October 13 2024
Breaking News

कोरानाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) जिल्ह्यात 15 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

Spread the love

कोल्हापूर (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरानाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात यापुर्वीच्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 1 जून 21 रोजीच्या सकाळी 7 वाजल्यापासून ते दिनांक 15 जून 21 रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
दिनांक 14 एप्रिल 21 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते दिनांक 1 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वा. पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पारित करणेत आले होते. या आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 15 मे 21 रोजीच्या सकाळी 7 वाजल्या पासून ते दिनांक 1 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.
कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत साथरोग कायदा 1897, कलम 2 नूसार दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 याच्या तरतुदी नूसार जारी करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दिनांक 1 जून 2021 रोजीच्या सकाळी 7 वा. पासून ते दिनांक 15 जून 2021 रोजीच्या सकाळी 7 वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तुंच्या वाहतूकीवर निर्बंध नाहीत. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास सदर दुकान, कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही. तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तसेच शासनाकडील दिनांक 12 मे 21 रोजीच्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी जाणार

Spread the love  योजनेत निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिनंदन कोल्हापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *