खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता खानापूर) अरण्यविभागाचे कर्मचारी विठ्ठल देसाई आणि उपवलय अधिकारी ए. ए. मुल्ला यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी अरण्य वलय अधिकारी प्रशांत गौरानी याच्याहस्ते शाल, श्री फळ, भेटवस्तू, पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
निवृत्त कर्मचारी विठ्ठल देसाई यांनी ४२ वर्षे सेवा केली आहे.
तर उपवलय अधिकारी ए. ए. मुल्ला यांनी ३६ वर्षे विविध हुद्द्यावर सेवा बजावली आहे
यावेळी सेवानिवृत्त निमित्त महावीर नंदगावी, लाडबा राऊत, वाय. एस. पाटील, गीरीष वाळद, मल्लापा पुजार आदीनी त्यांच्या सेवेच्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगमेश दौडगौडर यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत मल्लिकार्जुन वाळद यानी केले. तर आभार बाळू नाईक यानी मानले.
Check Also
बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी
Spread the love खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार …