Monday , December 4 2023

कर्नाटकात ४२ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद

Spread the love

बेंगळुरू : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग मंदावला आहे. सोमवारी, ४२ दिवसानंतर राज्यात सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासात, नवीन संसर्ग झालेल्या रुग्णांपेक्षा दोन पटहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मे महिन्यातच ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचणारा सकारात्मकता दर आता १३.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोविडची १६,६०४ नवीन प्रकरणे नोंदली गेली.

दरम्यान राज्यात १९ एप्रिल रोजी १५,७८५ आणि २० एप्रिल रोजी २१,७९४ प्रकरणे आढळली होती. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २६ लाखांच्या पुढे गेली आहे. अद्याप ३.१३ लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या २४ तासात राज्यात कोविडची १६,६०४ नवीन प्रकरणे नोंदली गेली. त्यापैकी २४ टक्के प्रकरणे बेंगळूर शहरी जिल्ह्यातील आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २६,०४,४३१ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर यापैकी २२,६१,५९० लोक बरे झाले आहेत. त्यापैकी सोमवारी ४४ ४७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात सध्या ३,१३,७३० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत एकूण २९,०९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सोमवारी ४११ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६. ८३ टक्के आणि मृत्यूचे प्रमाण १.११ टक्के आहे.

About Belgaum Varta

Check Also

बंगळूरातील ६० हून अधिक शाळांत बॉम्बच्या धमकीचे ई-मेल

Spread the love  पालक विद्यार्थ्यात घबराट; धमकीमागे अतिरेक्यांचा हात असल्याचा संशय बंगळूर : सिलिकॉन सिटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *