तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोल्हापूर जिल्हा पोलिस जिल्हा अधीक्षक शैलेश बलकवडे साहेब यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडकूर (ता. चंदगड) येथे भेट दिली.
यावेळी पो. अधिक्षक श्री. बलकवडे यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाय योजना सुचवल्या. अडकूर कोरोना हॉट स्पॉट गाव बनले आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच चंदगड तालुका लसीकरणाच्या बाबतीत जिल्ह्यात एक नंबर असल्याचे त्यांनी ह्या प्रसंगी सांगुन सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले.
यावेळी प्रसंगी चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. तळेकर, अडकुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ तसेच अडकुर गावची कोरोना कमिटी सदस्य, ग्रामसेवक श्री. सोनार, सरपंच यशोधा कांबळे आदिजन उपस्थित होते.
Check Also
मतदान केंद्र येती घरा….
Spread the love कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरुवात कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र …