ज्ञानेश्वर पाटील/कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये कोल्हापूरकर यांनी सतर्क राहणे गरजेचे असून नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की, गेल्या काहीं दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून रस्त्यावर गर्दी होताना दिसत आहे. यामूळे कोरोना संक्रमणहीं वाढत आहे. यांसाठी आम्ही पोलिस प्रशासनाकडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर आम्ही कारवाई करतं आहोत. सध्या आपण कोरोना संक्रमणच्या शेवटच्या टप्प्यात असून मागील दोन आठवड्यामध्ये पॉझीटीव्ह रेट हा कमी होताना दिसत आहे. तरीपण ज्या गतीने हा रेट कमी होताना दिसायला पाहीजे तसा दिसत नाहीये. कोरोना संक्रमण हे आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरानी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, तसेच ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढताना दिसत आहे. त्यासाठी आम्ही पोलिस प्रशासनाकडून ग्रामीण भेटीचा कार्यक्रम सुरू केला आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तेथील पोलिस अधिकारी हे गावपातळीवर भेट देत कोरोना संक्रमणाची आढावा माहिती घेत गावपातळीवरील कोरोना कमिटी सक्रिय करतं आहेत.
त्यामूळे एकंदरीत, कोल्हापूरकरानी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.