तरुणांकडून कोकरे, उमगाव, जांबरे ग्रामपंचायतीला देण्यात आले निवेदन
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यांतील उमगाव येथे जिओ टॉवर अनेक वर्ष उभारूनहीं आजतागायत बंद असल्याने प्रशासन व कंपनीकडून लवकरात लवकर हा टॉवर सुरू करण्यात यावा तसेच या भागात दुसऱ्या अन्य टॉवरसाठी ग्रामपंचायतीकडून शासनदरबारी व कंपनीकडे पाठपुरावा व्हावा या मागणीकरिता येथील उमगाव, पेडणेकरवाडी, न्हावेली, सावतवाडी, जांबरे या गावातील युवकांनी एकत्र येत भागातील सर्व ग्रामपंचायतीना निवेदन दिले.
जांबरे भागांतील प्रत्येक गावांतील सर्व तरुणांनी निषेध आंदोलनामधे सहभाग दर्शवुन अखेर कोकरे, उमगाव, जांबरे ग्रामपंचायतीला निवेदनद्वारे मागणी केली आहे.
या सदर निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, जांबरे भागातील अनेक गावांमधे गेली कित्येक वर्षे नेटवर्क टॉवर उपलब्ध नाही. त्यामुळे येथील सर्व गावांतील लोकांची गैरसोय होत असून अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे कृपया सदर विषय गंभीर असून शासनदरबारी टॉवर भागात नसल्याचा अहवाल पाठविणे व जर पेंडिंग मंजुरी असलेलाला टौवर असेल तर त्याबद्दल शासनदरबारी त्याचा पाठपुरावा करावा.
या भागात नेटवर्क टॉवर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास घेणे, शिक्षण घेणे, खाजगी कामे न होणे, शासकीय कागदपत्रे न मिळणे, युवावर्ग व ग्रामस्थांना या मोबाईल सेवेचा लाभ न मिळणे, आपत्तीकाळात तालुक्याच्या ठिकाणी संर्पक न झाल्याने अनेक अडचणी येणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत. तरी कृपया वरिष्ठ अधिकारी म्हणजेच तहसिलदार, बिडीओ, जिल्हाधिकारी, राज्यसरकार व दूरसंचार विभाग यांना अहवाल पाठवून वरील विषयबद्दल पाठपुरावा करावे अशी यामधे विनंती करण्यांत आली आहे.
यावेळी निवेदन देताना चंद्रकांत गावडे, अनिल पेडणेकर, विजय पाटील, जयसिंग हाजगूळकर, विश्वनाथ देवणेे, ज्ञानेश्वर धुरी, सतीश अम्रूस्कर सह पत्रकार ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. तर आंदोलनस्थळी शेकडो तरुणांनी हजेरी लावली होती.