बेंगळूर : रविवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमधील बेकायदेशीर स्थलांतरितांना कर्नाटकच्या बाहेर पाठवणार असल्याचे सांगितले. रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना राज्यातील अशा लोकांना ओळखण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राज्यातील जागा कमी असलेल्या लोकांना निवासी भूखंड देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू असेही त्यांनी आश्वासन दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की कोरोना प्रकरणे कमी झाल्यास ज्या जिल्ह्यांमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे त्या जिल्ह्यांना अनलाॅक करण्यात येईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी ११ रोजी २०१५ पासून उत्तर कन्नड जिल्ह्यातील भटकळ येथे राहणाऱ्या पाकिस्तानी महिलेला कर्नाटक पोलिसांनी ला अटक केली होती. ती याठिकाणी पती आणि तीन मुलांसमवेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास होती.
तसेच मंगळूर येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ३८ श्रीलंकन नागरिकांना मंगळूर पोलिसांनी शुक्रवारी ११ रोजी अटक केली. हे सर्व श्रीलंकन नागरिक मार्चच्या मध्यात तमिळनाडूला पोचले, त्यानंतर बेंगळूर आणि त्यानंतर ते मंगळूर येथे आले होते. तसेच यांना मदत करणार्या ६-७ नागरिकांनाही अटक केली आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …