बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडीचे माजी अध्यक्ष व विद्यमान ट्रस्टी, माजी प्राचार्य आर. के. कुट्रे यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. त्यानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्टच्यावतीने बी. के. बांडगी सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. आज या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अनंत लाड हे होते.
प्रारंभी अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून कुट्रे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सर्व ट्रस्टीजनी फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी बोलताना गोपाळराव बिर्जे यांनी कुट्रे सरांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. रामभाऊ कुट्रे यांनी ज्या ज्या संस्थेमध्ये काम केले ते जिद्दीने केले. हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्यंत ते शांत बसत नव्हते, असे श्री बिर्जे म्हणाले. तर मराठा समाज सुधारणा मंडळाची इमारत उभी करण्यात रामभाऊ कुट्रे यांचा सिंहाचा वाटा होता असे नेताजीराव जाधव म्हणाले. रामभाऊ कुट्रे यांनी मुख्याध्यापक म्हणून विश्व भारत सेवा समितीत केलेल्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी बोलताना अनंत लाड यांनी घुमटमाळ मारुती मंदिराचे विविध उपक्रम राबविण्यासाठी रामभाऊ कुट्रे यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे असे सांगितले. सुनिल चौगुले यांनी सूत्रसंचालन केले आणि रामभाऊ यांच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी उपाध्यक्ष चंद्रकांत बांडगी, ट्रस्टी संभाजीराव चव्हाण, चंद्रकांत पवार, रघुनाथ बांडगी, बाबुराव पाटील, मोहन मेलगे, विक्रम चिंडक, प्रकाश माहेश्वरी, सेक्रेटरी कुलदीप भेकणे यांच्यासह बाळू किल्लेकर, उदय कुट्रे आदी उपस्थित होते.
Check Also
भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …