खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे जनता वैतागली असताना सरकारने देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्याचे जगणे मुष्किल झाले आहे. सध्या देशभरात पेट्रोलच्या दराने १०० री गाठली, तर घरगुती स्वयंपाक गॅस ९०० रुपयापर्यंत गेल्याने याचा फटका गरीब महिलांना गॅसवर स्वयंपाक करणे डोळ्यातून पाणी येत आहे.
केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून इंधन दर वाढीचा भडका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याला सरकार जबाबदार असुन सत्ताधारी पक्षाने सत्तेवरून उतरण्याची वेळ आली. या सरकारला जनता कदापि माफ करणार नाही. तेव्हा भाजप सरकारने दर कमी करावा. अन्यथा सत्ता सोडावी. असा निषेध खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूरातील पेट्रोल पंपवर जोरदार निदर्शन केली.
यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
निदर्शन करताना आमदार डॉ. अंजली निंबाळकर, काँग्रेसचे ब्लाॅक अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, वैष्णवी पाटील, आशा हलगेकर, मारूती भेकणे, टेकडी बंधू, महांतेश राऊत आदी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …