खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथे इदलहोंड ग्राम पंचायतीने सर्वे नंबर १३ मधील गायरानमध्ये घन आणि द्रव्य कचरा विल्हेवाट प्रकल्प राबविण्याची तयारी पीडीओ महांतेश पाटील यांनी सिंगीनकोप ग्राम पंचायतीच्या सदस्याना तसेच नागरिकाना विश्वासात न घेता प्रकल्प राबविण्याची सहमती दर्शविली. सर्वे नंबर १३ मधील गायरान जनावरांच्या चाऱ्यासाठी ठेवण्यात आले आहे. इतरत्र कुठेच गायरान नाही. जर या ठिकाणी प्रकल्प उभारला तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभाणार. तेव्हा या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध करण्यात येत आहे अशा आशयाचे निवेदन उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांना देण्यात आले.
यावेळी उपतहसीलदार के. वाय. बिद्री यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
निवेदन देताना ग्राम पंचायतीे सदस्य परशराम कुंभार, सदस्या सौ. माया प्रकाश कुंभार, कलराम पाटील, दुधापा कुंभार, माजी ग्रा. पं. सदस्य कृष्णा कुंभार, सतीश कुंभार, फकिरा पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा द्या : बेळगाव बार असोसिएशनची मागणी
Spread the love बेळगाव : तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला …