कोगनोळी : येथून जवळच असणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. बुधवार तारीख 16 व गुरुवार तारीख 17 रोजी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे.
दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी पाण्यामध्ये बुडल्या आहेत.
यामुळे येथील शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील गटारी व ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. सुरु झालेला हा मान्सून पाऊस कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात असल्यानेच दूध गंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या कोगनोळी व परिसरामध्ये राहून राहून मोठ्या पावसाच्या सरी पडत आहेत. आणखी दोन-चार दिवस असाच पाऊस राहिला तर दूधगंगा नदीचे पाणी लगतच असणाऱ्या गावाशेजारील वस्तीत शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …