खानापूर (प्रतिनिधी) : कोरोना काळात कोविड रुग्णांची सेवा केल्याबद्दल खानापूर तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने खानापूरातील शांतिनिकेतन स्कूलमधील श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरच्यावतीने मान्यवराचा सत्कार नुकताच करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चाचे राज्याध्यक्ष डॉ. संदीप कुमार, जनरल सेक्रेटरी डॉ. मल्लिकार्जुन बाळेकाई, अजित हेगडे, राज्य युवा मोर्चा सेक्रेटरी इराना अंगडी, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष बसवराज नेसरगी, सुनील मड्डीमनी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दर्शन किल्लारी, मारूती टक्केकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोरोनाच्या काळात रुग्णांची सेवा केल्याबद्दल डाॅ. कुलकर्णी, जाॅर्डन गोन्साल्विस, आनंद पाटील, तसेच श्री महालक्ष्मी कोविड केअरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर, उपाध्यक्ष पंडित ओगले, सचिव सदानंद पाटील आदीचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सचिव गुंडू तोपिनकट्टी, जिल्हा कार्यकरिणी सदस्य व माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, नगरसेवक आप्पया कोडोळी आदी उपस्थित होते. सत्कार सोहळ्याला भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने अंगणवाडीतील 100 मुलांना स्वेटर्स प्रदान
Spread the love बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने मन्नूर येथील अंगणवाडीतील 100 मुलांना …