बेळगाव : शहरातील हेल्प फाॅर नीडी आणि फुड फाॅर नीडी या सेवाभावी संघटनांचे संकटमय कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्य पाहून सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेले विनय राजेंद्र मठद यांनी या संघटनांना त्यांच्या समाजसेवेसाठी 10,000 रुपयांची मदत पाठवून दिली आहे. विनय हे बेळगावातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. राजेंद्र सी. मठद यांचे चिरंजीव होत. विनय मठद यांनी चक्क ऑस्ट्रेलियातून आपल्याला मदत केल्याबद्दल हेल्प फाॅर नीडी आणि फुड फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
Check Also
सहाव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान
Spread the love बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त …