Monday , September 21 2026
Breaking News

शारदा विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहात प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : शाहापूर येथील शारदा विद्यालय (इंग्रजी माध्यम) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ला १ जूनपासून उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या आगमनाने शाळा परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. वर्षारंभानिमित्त शाळेत सरस्वती पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. स्वाती घोडेकर यांच्या स्वागत भाषणाने झाली.

यावेळी मुख्याध्यापिका स्वाती घोडेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात शाळेचे चेअरमन श्री. कृष्णकुमार चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शिस्त, मेहनत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

याप्रसंगी शाळेचे व्हा. श्री. संजय रंगरेज, कमिटी मेंबर्स सौ. शिला धोंगडी, सौ. सुधा चौधरी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षिका सौ. रचना कणबरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या शाळेत विद्यार्थ्यांनीही नव्या जोमाने शिक्षणाचा श्रीगणेशा केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *