Sunday , July 26 2026
Breaking News

मोटारसायकल चोरट्याला अटक; पाच दुचाकी जप्त

Spread the love

 

बेळगाव : शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा तपास करताना हिरेबागेवाडी पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या पाच चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लक्ष्मण विरुपाक्ष कणबर्गी (वय ३१, रा. अडिवेप्पन अंकलगी, ता. गोकाक) असे आहे. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ०२/२०२६ अंतर्गत तपासादरम्यान आरोपीचा शोध घेण्यात आला. चौकशीत त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

ही कारवाई बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी (कायदा व सुव्यवस्था), निरंजन राजे अरस (गुन्हे व प्रशासन) तसेच एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. के. पोळेण्णवर यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय अविनाश यरगोप्पा, बी. के. मिटगार तसेच पोलीस कर्मचारी एम. आय. तुमरी, प्रभाकर भूषी, आर. एस. हाल, एस. के. केळगिनमणी, महांतेश कडेन्नवर आणि एम. जी. माणीचार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

या यशस्वी कामगिरीबद्दल संबंधित पोलीस पथकाचे पोलीस आयुक्तांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *