Thursday , December 26 2024
Breaking News

आणि जोशी कॉलनीतील अडकलेल्या पाण्याचा श्वास झाला मोकळा!

Spread the love

बेळगाव : शहर परिसरात बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे शाहुनगर येथील जोशी कॉलनीत आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी केरकचर्‍यामुळे साठून राहिल्याने लोकांची तारांबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच शहराचे आमदार अनिल बेनके आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पालिका कर्मचार्‍यांना बोलावून सूचना करण्यात आल्या. त्वरित साठून राहिलेला केरकचरा काढून पाण्याला वाट करून देण्यात याव्यात अशी सुचना मनपाचे अभियंता हणमंत कडलगी यांना करण्यात आली.

याबाबत येथील रहिवासी मि. इंडिया सुनील आपटेकर यांनी याबाबतीत माहिती देताना सांगितले की, महानगरपालिकेच्या खुल्या जागेवरवरून पावसाच्या पाण्याबरोबरच येणारा केरकचरा या मुख्य गटारीकडे साचून राहिल्याने हे पाणी मनपाच्या या जागेत तुंबून राहिले आणि त्यामुळे या पाण्याला पुढे जाण्यास वाट न मिळाल्याने ते रस्त्यावर पसरून बाजूला असलेल्या घरातून गेले.
अनेक लोकांनी, या जागेवर अतिक्रमणे करत, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या बरोबरच व झाडे उगवून घाणीचे प्रमाण वाढले आहे.ती या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आल्याने जागेवर साचून राहिल्याने पाणी जाण्यास वाट मिळाली नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांना संपर्क साधण्यात आला आणि त्यांनी त्वरित येथील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला.

शुक्रवारी सकाळी सात वाजता या ठिकाणी सुनील आपटेकर व महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता जेसीबीने करण्यात आली आहे. अनेकवेळा पालिकेकडे स्वच्छतेबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष होत होते. स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळे महानगरपालिकेच्या जागेमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबते. या साचलेल्या सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात सर्वत्र पसरते. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने परिसरात आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
घाण पाण्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून साथरोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही समस्या आमदार अनिल बेनके व सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या प्रयत्नामुळे आज जोशी कॉलनीतील अडकलेल्या पाण्याचा श्वास झाला मोकळा. यावेळी या परिसरातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कै. एम. डी. चौगुले व्याख्यानमालेस २९ डिसेंबरपासून सुरुवात

Spread the love  बेळगाव : दरवर्षी मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *