Wednesday , November 29 2023

इंधन दरवाढीचा भडका कायम; पेट्रोल १०३ रुपयांवर, डिझेल ९५ रुपयांवर!

Spread the love

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरुच असून शुक्रवारी पेट्रोल दरात 27 पैशांची तर डिझेल दरात 28 पैशांची वाढ करण्यात आली. ताज्या दरवाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल दराने 103 रुपयांची तर डिझेल दराने 95 रुपयांची पातळी ओलांडली.
तेल कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात वाढ केली नव्हती. पण जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर घसरुनही शुक्रवारी इंधन दरात वाढ करण्यात आली. मुंबईत पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर आता 103.08 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 95.14 रुपयांवर गेले आहेत. दिल्लीमध्ये हेच दर क्रमशः 96.93 आणि 87.69 रुपयांवर गेले आहेत. अन्य महानगरांचा विचार केला तर चेन्नईमध्ये पेट्रोलने दराने 98.14 रुपयांचा स्तर गाठला असून डिझेल दराने     92.31 रुपयांचा स्तर गाठला आहे. कोलकाता येथे हेच दर क्रमशः 96.84 आणि 90.54 रुपयांवर गेले आहेत.
गेल्या 4 मे पासून तेल कंपन्यांनी इंधन दरात सातत्याने वाढ केली आहे. या कालावधीत पेट्रोल दरात 6.61 रुपयांची तर डिझेल दरात 6.91 रुपयांची वाढ झाली आहे. देशातील अन्य शहरांचा विचार केला तर रांची येथे पेट्रोल 92.91 रुपयांवर तर डिझेल 92.57 रुपयांवर गेले आहे. कर्नाटकमधील बंगळूर येथे हेच दर क्रमशः 100.17 आणि 92.97 रुपयांवर गेले आहेत. भोपाळ येथे इंधन दर क्रमशः 105.13 आणि 96.35 रुपयांवर गेले असून पाटणा येथे हे दर क्रमशः 99 आणि 93.01 रुपयांवर गेले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

१७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेले ४१ पैकी ४१ मजूर बाहेर

Spread the love  नवी दिल्ली : उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसापासून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *