खानापूर (प्रतिनिधी) : चौथ्या दिवशी खानापूर शहरासह तालुक्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याचा स्त्रोत वाढत आहे.
तालुक्यातील अनेक नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्याच्या शिवारात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शिवारातील कामे बंद झाली आहेत.
तालुक्यातील हब्बनहट्टी येथील मलप्रभा नदीतील स्वयंभू मारूतीचे मंदिर पूर्णपणे बुडून गेले आहे. मलप्रभा नदीही दुथडी भरून वाहत आहे.
तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने हिरेमन्नोळ ग्राम पंचायत हद्दीतील करवीनकोप गावातील रामाप्पा मादार यांचे राहते घर कोसळुन नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक रस्ते पावसामुळे खराब झाले आहेत. काही ठिकाणी पाणी आल्याने संपर्कही तुटला आहे.
खानापूर तालुक्यात गेल्या २४ तास झालेल्या पावसाच्या प्रमाणात कणकुंबीत २१३.२ मि. मि. पावसाची सर्वात जास्त नोंद म्हणून जाहिर करण्यात आले.
तर जांबोटी १७२.२ मि मी., लोंढा पी डब्ल्यू डी १४२ मि मि., लोंढा रेल्वे १३७ मि मी., गुंजी १२५.३ मि मी., असोगा १००.४ मि मी., कक्केरी ८०.६ मि मी., बिडी ६२.२ मि मी., नागरगाळी ३५.३ मि मी., खानापूर ११२.२ मि मी. पावसाची नोंद झाली आहे.
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …