Sunday , September 20 2026
Breaking News

गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवर झाड पडून आजी-नातू ठार

Spread the love

गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हॉटेस सूर्यासमोर आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवरच झाड कोसळल्‍याने यामध्ये शांताबाई पांडुरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल, ता. गडहिंग्लज) व नातू सतीश जोतिबा शिंदे (वय ३६, रा. अत्याळ) यांचा मृत्‍यू झाला. सतीश हा आपल्या आजीला गावी घेऊन गेला होता. आज सकाळी तिला सोडण्यासाठी जात असताना ही घटना घडली. तो गडहिंग्लज शहरात हॉटेल सूर्यासमोरुन येत असताना अचानकपणे चालत्या दुचाकीवरच हे झाड कोसळले. यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र दोघांचीही प्राणज्योत मालवली. घटनेनंतर तहसीलदार दिनेश पारगे यांनी घटनास्थळी भेट दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *