जुमनाळ (ता.बेळगाव) : येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई शुक्रवारी काकती पोलिसांनी केली आहे. सदर कारवाई दरम्यान 15 हजार 450 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दुर्गाप्पा अंकलगी, फकीराप्पा नायक, लगमाण्णा नायक, बाळू नायक, सचिन पणगुती, बाकाप्पा माशानटी, लगमंना नायक अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. जुमनाळ येथील दुर्गा माता मंदिराजवळ जुगार खेळला जात आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक राघवेंद्र वर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत छापा टाकून सदर कारवाई केली आहे.
Check Also
बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे संस्थेचा 25 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
Spread the love पुणे : बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे या संस्थेचा 25 वा …