Monday , December 23 2024
Breaking News

कोगनोळीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

Spread the love

कोगनोळी : येथे कागलहून कोगनोळीकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 21 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. नरसु बापू लोखंडे (वय 45) राहणार कोगनोळी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नरसु लोखंडे हे कोगनोळी फाट्यावरून लोखंडे गल्ली येथे राहत असलेल्या घराकडे जात होते. जवळच असणाऱ्या गुरवाच्या पुलानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत नरसु हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांना कोगनोळी येथील दवाखान्यात दाखवून प्रथम उपचार करून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी निपाणी मंडल पोलीस निरीक्षक सगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय बी. एस. तलवार, कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस. ए. टोलगी, पोलीस राजू खानपणावर, अमर चंदनशिव यांनी पाहणी करून पंचनामा केला.
सदर घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
नरसु यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *